सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
मुंबई कोल्हापूर दरम्यान धावणारी कोयना एक्स्प्रेस रविवारी रद्द व पुणे कोल्हापूर दरम्यान धावणारी पॅसेंजर रविवारी पुणे सातारा दरम्यान रद्द झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून शुक्रवारी रात्री देण्यात आली आहे.
कोल्हापूर पुणे लोह मार्गावरील मिरज पुणे दरम्यान रेल्वे मार्गाचे दु पदरीकरण व काही ठिकाणी नव्याने अंडरपासची कामे सुरू आहेत. रविवारी नीरा लोणंद दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक नव्या रेल्वे रुळांना जुन्या रुळांशी जोडण्याची काम व इतर कामे होणार आहेत. यामुळे काही काळासाठी संपूर्ण रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागत असते. रविवार दि. २० ऑगस्ट रोजी गाडी नंबर ११.३० कोल्हापूर हुन मुंबईकडे जाणारी व ११.२९ मुंबई हुन कोल्हापूरकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस धावणार नाही तसेच ११४२५ पुणे ते कोल्हापूर व ११४२६ कोल्हापूर ते पुणे पॅसेंजर गाडी पुणे ते सातारा दरम्यान बंद राहणार आहे. कोयना एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडीच्या दोन्ही दिशांच्या फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांनी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा असे आव्हान रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.