भोर ! वृक्ष संगोपन काळाची गरज : आंबाडेचे सरपंच हेमलता खोपडे यांचे प्रतिपादन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
नैसर्गिक ऑक्सिजन निर्मिती हीच वृक्षारोपणाची प्रमुख वैशिष्ट्ये असून निसर्गाचा ऱ्हास होऊ न देता नैसर्गिक समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून वृक्ष संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आंबाडे ता.भोर येथील सरपंच हेमलता मिलिंद खोपडे यांनी केले.
     स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर आंबाडे-कोळेवाडी पर्यावरण संकल्पचे तुषार खोपडे,बाबू खोपडे यांच्या माध्यमातून केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी सरपंच खोपडे बोलत होत्या.यावेळी ग्रामपंचायत येथे सरपंच हेमलता खोपडे यांनी तर प्राथमिक शाळा कोळेवाडी,आंबाडे,काळेश्वरी माध्यमिक विद्यालय येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी ध्वजारोहण केले.पाणी शुध्दीकरण प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त कविता मनोज खोपडे यांचा , १० वी ,१२ वीत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान ग्रामसभेत करणेत आला.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने दिपाली राजेंद्र खोपडे कविता मनोज खोपडे, मेघा शिवाजी खोपडे,सविता अनिल निकम यांना सन्मानित करणेत आले.उपसरपंच प्रमोद सपकाळ,सदस्य ज्ञानेश्वर खोपडे,कविता खोपडे, माधुरी खोपडे,गिता उल्हाळकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष तृप्ती वाघुलकर तसेच जयवंत निकम गोरखकाका खोपडे, रणधीर खोपडे,मनोज खोपडे, उत्तम खोपडे,राजू खोपडे,बाजींनाना खोपडे, पै.शिवाजी खोपडे,सुरेश खोपडे,जगुदादा खोपडे ,अमर खोपडे, राजू वाघुलकर,अशोक खोपडे,ताराचंद खोपडे, नंदाआप्पा खोपडे, प्रसन्न उल्हाळकर, तुकाराम उल्हाळकर, नवनाथ खोपडे, दिलीप वाघुलकर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
To Top