सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
कर्नाटक सरकारने प्रशासकीय कारण देत बागलकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा तेथून हटवल्यामुळे निरा शहरांमध्ये असंख्य शिवप्रेमींच्यात संतापाची लाट उसळली असून या घटनेच्या निषेधार्थ नीरा शहरांमध्ये या विरोधात आंदोलन करण्यात आले.
शिवप्रेमी अजित सोनवणे, प्रमोद काकडे यांच्या नेतृत्वाखाली बागलकोटा कर्नाटक येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे जाहीर निषेध करत कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अजय राऊत, ऋषी धायगुडे, अभिजीत जगताप, बाळा लकडे, शुभम काकडे, सचिन मोरे, अनिकेत शिंदे, सार्थक धायगुडे , संतोष मोहिते, सिद्धू दळवी यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित सोनवणे म्हणाले जोपर्यंत छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्या ठिकाणी कर्नाटक सरकार बसवत नाही तोपर्यंत कर्नाटक सरकारची एकही बस निरा शहरांमध्ये फिरू देणार नाही अशा आशयाचे निवेदन वाहतूक नियंत्रक नीरा बस स्थानक प्रमोद सोनवणे यांना दिले. व आमची मागणी मान्य न झाल्यास या निर्णयाविरोधात आणखी उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोकाशी, पोलीस नाईक हरिश्चंद्र करे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.