सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
वाल्हे नजीक सुकलवाडी येथे दिसलेल्या बिबट्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले होते. आज वाल्हे नजीक वडाची विहीर येथे वन विभाग कर्मचाऱ्यांनी (रेस्क्यू ऑपरेशन टीम ) बिबट्याला पकडण्यात यश मिळवले.
पुणे येथून वन विभाग कर्मचाऱ्यांनी वाल्हे येथे येत येथील ग्रामस्थांशी चर्चा करून ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणाची माहिती घेऊन वाल्हे नजीक वडाची विहीर येथे झाडाखाली पुणे येथील रेस्क्यू ऑपरेशन टीमने बिबट्याला जेर बंद करण्यात आले बिबट्याच्या दर्शनाने भय भीत झालेल्या ग्रामस्थांना यामुळे दिलासा मिळाला आहे पकडलेला बिबट्या हा तो नसून हा दुसराच बिबट्या आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असण्याची शक्यता आहे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना योग्य ती काळजी घेऊन काम करण्याचे आवाहन केले आहे