सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
समाजात आज पर्यंत माणसाची अंत्ययात्रा काढली जात होती.मात्र भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील महुडे खोऱ्यातील ब्राह्मणघर ता.भोर येथील शेतकऱ्याने चक्क १६ वर्षाच्या राणी गाईवरील अतुट प्रेम व जिव्हाळ्याचे नाते जपत मयत राणीची(गायी) माणसाप्रमाणे भजनाचे गायन करीत शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैलगाडीतून अंत्ययात्रा काढली.
ब्राम्हणघर येथील शेतकरी सदाशिव सीताराम कुमकर यांच्या कुटुंबीयांनी पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळलेल्या राणी गाईचा मृत्यू होताच डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंच्या धारांनी आपल्या लाडक्या गायीला अखेरचा निरोप दिला.शेतकऱ्याच हे गाईवरच प्रेम पाहून गावातील नागरिक देखील भारावून गेले होते.यावेळी गाईच्या अंत्ययात्रेसाठी गणेश बांदल, दत्तात्रय चांदेकर ,संतोष बांदल ,संजय पवार ,निलेश कुमकर, पांडुरंग कुमकर, विठ्ठल कुमकर तसेच भजन मंडळ ब्राह्मणकर यांचे सहकार्य लाभले.
COMMENTS