सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
नीरा बारामती रस्त्यावर बुवासाहेब मंदिरा नजीक चालू असलेल्या रस्त्याच्या गटरलाईनच्या कामामुळे झाड कोसळले असून यामध्ये एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. नीरा ता. पुरंदर येथे नीरा येथे बुवासाहेब ओढ्यावर घटना घडली आहे.
रस्त्यालगत असणारे मोठे सुबाभळीचे झाड रस्त्यावरती कोसळल्यामुळे रस्त्यावरून जाणारी बुलेट गाडी क्र M H 42 BA 701 या दुचाकीवरील शंभू वाघमारे रा. निंबुत ( कोळी वस्ती) ता.बारामती हा युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. पुढील उपचारासाठी त्याला नीरा येथील जीवनदीप हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून वाहतुक सुरळीत होण्यास दोन तासाचा कालावधी लागू शकतो.