बारामती ! दादा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले..आणि पदाधिकारी स्वतःला आवरू नाहीत शकले ! बारामतीतील भव्य सत्कारात..एकच वादा अजित दादा म्हणत..सोमेश्वर कारखान्याच्या दोन संचालकांनी स्वतः हलगी आणि झांज वाजवत ठेका धरला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. यानिमित्ताने काल बारामतीकरांनी त्यांचा भव्य सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. यामध्ये अनेक दादा प्रेमींनी आपआपल्या पद्धतीने दादा प्रेम प्रकट केले. सोमेश्वर कारखान्याचे संचालक असलेले लक्ष्मण गोफणे व ऋषी गायकवाड यांनी स्वतः हलगी आणि झांज हातात घेत ठेका धरला. 
         उपमुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतल्यानंतर अजित पवार काल पहिल्यांदाच बारामती मधे आले होते. या वेळी दादांच्या मनात बारामती आणि बारामतीकरांच्या मनात दादा असल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.     काहींनी क्रेनच्या साह्याने दादांना हार घातला, काहींनी हार तुरे देऊन सन्मान केला तर काही दादा प्रेमींनी स्वतःलाच क्रेनला लटकवून दादांच्या गळ्यात हार घातला.
           यावेळी बारामती तालुक्यातील दादांचा मुकुटमणी असणाऱ्या सोमेश्वर परिसरातून युवक कार्यकर्त्यांनी सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली.
         प्रचंड उत्साहाने गेलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या समस्यांची, राजकारणाची व सहकाराची नाळ ज्यांना समजली आहे अश्या अजितदादांना एकदम गावठी रंगात आणि ढंगात तडतड ताशा आणि तुतारीची सलामी दिली.

यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मण तात्या गोफणे, बारामती खरेदी विक्री संघाचे संचालक विक्रम भोसले, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे, वाघळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत गायकवाड, करंजेपुल ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेशकाका गायकवाड,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवाजी शेंडकर,राजेंद्र गायकवाड,निखील शेंडकर,प्रताप गायकवाड,महेश शेंडकर,प्रदीप शेंडकर,सोनू भोसले,दादा शेंडकर,सूरज जाधव,दत्ता जाधव, दिग्विजय मगर,केतन गायकवाड ,आदी उपस्थित होते.
To Top