सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून आत्महत्या, खून तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. तसेच आर्थिक फसवणूकीच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
साताऱ्यातील वाई न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. एका कुविख्यात गुंडांसह आणखी दोघांवर हा गोळीबार करण्यात आला. अनिकेत उर्फ बंटी जाधव असे या कुविख्यात गुंडाचे नाव आहे. त्याच्यासह आणखी दोन जणांवर हा गोळीबार करण्यात आला. तर या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.