सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यात चालू असलेल्या नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाविरोधात तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाला असून पाच गावाच्या ग्रामपंचायतींनी अधिकृतपणे अस्तरीकरण विरोधाला जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत अस्तरीकरण रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून दि. ९ ऑगस्ट रोजी बुधवार क्रांती दिनी छत्रपती शिवाजी महाराज चौक नीरा या ठिकाणी अस्तरीकरण विरोधात जाहीर निषेध मोर्चा व रास्ता रोको यामध्ये नऊ गावातील सर्वपक्षीय शेतकरी सहभागी होणार आहे.
या आंदोलनाची प्रत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री बंधारेविभाग, जेजुरी पोलीस स्टेशन, नीरा पाटबंधारे विभाग देण्यात आली आहे. या पत्रावर नऊ गावातील सहाशे शेतकऱ्यांच्या सह्या असून या जाहीर निषेध मोर्चा व रस्ता रोको मध्ये सर्वपक्षीय शेतकरी सहभागी होणार आहेत.
अस्तरीकरण हटाव शेतकरी बचाव मोर्चाचे समन्वयक महेश जेधे यांनी 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की नऊ गावातील शेतकऱ्यांशी घोंगडी बैठक आधारे संवाद साधला असता त्यांनी या अस्तरीकरणा विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत अस्तरीकरण होऊन देणार नाही अशी शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे