सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा बारामती रस्त्यावर होळ गावाच्या हद्दीत रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ओमीनी गाडी झाडावर धडकून आठ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमी हे कोऱ्हाळे (१५ फाटा) येथील आहेत.
अक्षय शिंदे, कालिदास शिंदे, सुरेश शिंदे, कालिदास पवार, विकास शिंदे, रमेश शिंदे, अशोक शिंदे, सुनील शिंदे, सर्व जखमी २५ ते ३२ वयोगटातील आहेत. नीरा बारामती रस्त्यावर अभिषेक मंगल कार्यालय जवळील वळणावर असलेल्या झाडावर ही गाडी आदळून अपघात झाला आहे. सर्व जखमी पुणे याठिकाणी गणपती विसर्जनाला गेल्याचे सांगितले जात आहे. आठ पैकी तिघे जबर जखमी झाले असून सर्वांना उपचारासाठी सोमेश्वरनगर येथील साई सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.