सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याला येणाऱ्या काळात ऊस टंचाईला सामोरे जावे लागणार असून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवडीसाठी होव्यात यासाठी संचालक मंडळाने सभासदांना प्रोत्साहन द्यावे. अशी मागणी सोमेश्वर कारखान्याचे मा. संचालक पी के जगताप यांनी केली आहे.
याबाबत जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणटले आहे की, कार्यक्षेत्रामध्ये अनेक कारखान्याची विस्तारवाढ झाली आहे. सोमेश्वरचा २०२१-२०२२ व २०२२-२०२३ मध्ये गेटकेन ऊस घटलेला आहे तरी आपण कार्य क्षेत्रातील ऊस वाढिसाठी प्रयत्न न केल्यास भविष्यात कारखाना कमी दिवसात बंद करावा लागणार आहे. कारण पाणी टंचाई पाऊस कमी, जरी आपले कारखान्याचे क्षेत्र चार तालुक्याचे असले तरी खंडाळ्यामध्ये कारखाना चालू झाला आहे. शेजारी साखरवाडीची विस्तारवाढ झाली आहे. आपण सुद्धा विस्तारवाढ केली आहे अजितदादांचे कारखाने १५ ते २० हजार टन दैनंदिन ऊस गाळप क्षमतेचे झाले आहेत. असे असताना आपण विस्तारवाढ केली आहे असे असताना आपले संपूर्ण कार्यक्षेत्र कसे राहील व ६० वर्ष आपणाकडे असलेली गावे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये राहतील याचा विचार करून १० गावे माळेगाव कारखान्यास देण्यात येऊ नये सदर गावातील सभासद गावे सोमेश्वरला रहाण्यासाठी न्यायालयात गेली आहेत. सदर गावे माळेगावला गेल्यास आपला कारखाना लवकरच बंद करावा लागेल तरी आपण या सम्पूर्ण गोष्टीचा विचार करून गावे आपल्याकडे ठेवण्यात यावीत. असे प्रसिद्धीपत्रकात म्हणटले आहे.
COMMENTS