सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे.
पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पुरंदरच्या दक्षिण पूर्व पट्ट्यात आजही पाऊस नाही यामुळे या भागातील विहिरी ओढे नाले तसेच तळी कोरडी ठक पडली आहेत.
गणेश विसर्जनाला मूर्ती विसर्जनासाठी या भागातील गणेश भक्तांना नीरा डाव्या कालव्याचा आधार घ्यावा लागतोय. गुळूंचे, राख, कर्नलवाडी या परिसरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी नीरा डाव्या कालव्यावर आणण्यात आल्या.
दरवर्षी गणेश उत्सवाच्या आधी मुबलक प्रमाणात या भागात पाऊस पडत असतो त्यामुळे भरून वाहणारे ओढे नाले किंवा विहिरीमध्ये घरगुती गणपती बाप्पा च्या मूर्ती विसर्जित केल्या जातात. यावर्षी पाऊसच नाही तर विहिरी वओढ्यांना कुठून पाणी येणार आहे यामुळे येथील गणेश भक्तांना तब्बल पाच ते सात किलोमीटर अंतरावर येऊन मूर्तींचे विसर्जन करावं लागलं.
नीरा डावा कालव्या वरती मुबलक प्रमाणात पाणी असल्याकारणाने मूर्ती विसर्जित करण्यासाठी गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती.
COMMENTS