Bhor Big Breaking ! संतोष म्हस्के ! वरंधा घाटातील निरा-देवघर धरणात चारचाकी कोसळली : स्थानिकांच्या सतर्कतेने प्रवाशी सुखरूप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील वरंधा घाटात वारवंड-शिरगाव हद्दीतील वळणावर नीरा-देवघर धरणात चालकाचे फॉर्च्यूनर गाडीवरील ताबा सुटल्याने धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळली. स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेने गाडीतील तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून प्रवासी किरकोळ जखमी आहेत.
   वरंधा घाटातील मौजे शिरगाव गावच्या हद्दीत भोर मार्गे महाडकडे जाणारी फोरचुनर गाडी निरा-देवघर धरणात वाहनावरील स्पीड कंट्रोल न झाल्याने  रोड सोडून धरणाच्या बॅकवॉटरच्या झाडात अडकली. सदर गाडीतील तीन इसम यांना किरकोळ जखम झाले असून सुखरूप आहेत. घटनास्थळी भोर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत. 
To Top