Indapur Breaking ! आकाश पिसाळ ! भिगवण येथे व्यावसायिकाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

Admin
2 minute read
भिगवण : प्रतिनिधी, आकाश पिसाळ
भिगवण बाजारपेठेतील व्यवसायिकाने राहत्या घरी  वायरच्या सहायाने गळफास घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना दुपारच्या सुमारास घडली. आर्थिक  विवंचना ,सावकारी त्रासामुळे आत्महत्या केली की घरगुती काहि कारणामुळे याचा उलघडा झालेला नाही.
       याबाबत मिळालेल्या माहिती नुसार शैलेश धरमचंद ओसवाल वय ५० रा.राही आंगण बिल्डिंग भिगवण  असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.याबाबत मयत शैलेश यांच्या पत्नी मेघना ओसवाल यांनी भिगवण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.शैलेश ओसवाल आज नियमित पणे कामकाज करित असताना एका भिशी ठिकाणी भिशीचा लिलावं बोलून घरी गेले असताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.याबाबत बाजारपेठेत उलट सुलट चर्चा केली जात होती .मात्र त्यांच्या आत्महत्ये बाबत कोणतेही कारण समोर आलेले नाही.ओसवालं यांच्या या आत्महत्येमुळे भिगवण बाजार पेठेवर  शोककळा पसरल्याचे दिसून आले. भिगवण पोलिसांनी पंचनामा करित त्यांचे पार्थिव इंदापूर येथे  शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले .याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करित आहेत.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी भिगवण बाजारपेठेतील व्यवसायिकाने जीव दिल्याची घटना अतिशय दुःखद असून ओसवाल यांच्या नातेवाईक यांनी तक्रार केल्यास पुढील तपास योग्य पद्धतीने होणार असल्याचे सांगितले.तसेच त्यांच्या काही डायऱ्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले.
To Top