सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर येथे मंगळवार दि.२६ आरोग्यवर्धिनी स्वरूपाताई संग्राम थोपटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून भव्य मोफत महाआरोग्य तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले असून तालुक्यातून आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.अशी माहिती पत्रकार परिषदेत सौ.थोपटे यांनी दिली.
यापूर्वी दोन वेळा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरांमध्ये ३ हजारच्या आसपास रुग्णांच्या तपासण्या करून शस्त्रक्रिया करण्यात आले आहेत.तर अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवित रविवार दि.२४ विशाल सत्संग सोहळा व स्नेहभोजन, सोमवार दि. २५ हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मृतिदिनानिमित्त कातकरी समाजाला साडी व कपडे वाटप व स्नेहभोजन तर मंगळवार दिं.२६ मोफत भव्य महारोग्य तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिर तसेच अनंत निर्मल चारीटेबल ट्रस्ट भोर-वेल्हा-मुळशी नाम फलकाचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.