सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
नीरा ता. पुरंदर येथील ज्युबिलंट इन्ग्रेव्हीया कंपनीमध्ये इथल फाईव्ह कॉम्प्रेसर मध्ये स्फोट होऊन तीन ते चार कामगार जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून पुढील उपचारासाठी पुणे येथे दवाखान्यात हलवण्यात आले आहे.
ऍसिड कॉम्प्रेसर प्लांटमध्ये स्वच्छता करीत असताना स्फोट होऊन तीन ते चार कामगार गंभीररित्या जखमी झाले झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कंपनीमध्ये ऍसिड कॉम्प्रेसरच्या प्लांटची स्वच्छता करताना चार कामगार जखमी झाले असून तिघांना लोनंद येथे तर एकाला पुणे येथे उपचारासाठी दाखल केले आहे. दोन वर्षांपूर्वीच्या कंपनीतील घटनेच्या आठवण ताजी असतानाच हा स्फोट घडल्यामुळे निरा व निरा परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. कंपनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.