Bhor Big Breaking ! संतोष म्हस्के ! भाटघर धरणात तरुणाचा बुडून मृत्यू : नऱ्हे येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------
भोर : संतोष म्हस्के 
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भाटघर धरणाच्या बॅक वॉटरला असणाऱ्या नऱ्हे ता.भोर येथे हडपसर येथून पर्यटनासाठी आलेल्या चौघांपैकी एक जण धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.२ घडली.घटनास्थळी राजगड पोलीस राजेंद्र चव्हाण तसेच भोईराज जलआपत्ती पथक पोहोचून धरणातील पाण्यात बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यात आला.
     शनिवारची सुट्टी असल्याने भाटघर ता.भोर धरण परिसरात हडपसर(पुणे) येथील तरुण-तरुणी पर्यटनासाठी आले होते.यातील तरुणींना पोहण्याचा मोह आवरला नसल्याने नऱ्हे येथील भैरवनाथ तालीजवळ पोहण्यासाठी दोघे जण पाण्यात उतरले. यातील आदित्य अशोक केदारे (वय- २४) (रा.हांडेवाडी ससाणेनगर हडपसर पुणे) हा तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली.काही वेळातच तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
To Top