भोर ! जमीन भोगवटदार वर्ग एकमध्ये करा अन्यथा आत्मदहन करणार : भोर शहरातील धुमाळनगरच्या नागरिकांचा इशारा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
आमची जमीन भोगावटदार वर्ग एकमध्ये करा अन्यथा मंगळवार दि.५ तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देत भोर शहरातील धुमाळनगरच्या रहिवाशी नागरिकांनी आंदोलन केले.
         शहरातील धुमाळ नगर येथील शर्तभंग नियमित करण्यासाठी नजरांना रक्कम सण १९९३ च्या बाजारभावानुसार घ्यावी असे आदेश महसुली विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलेले आहेत. त्या आदेशाचे अंमलबजावणी करण्यास तहसीलदार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप धुमाळनगर परिसरातील १५५ फ्लॅट धारकांनी केला आहे. याबाबत संबंधित रहिवाशांनी शुक्रवार दि.१ पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी शेकडो रहिवासी उपस्थित होते. वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितले आहे. 
          धुमाळनगर मधील फ्लॅट धारकांच्या जमिनीचा नजराना चालू बाजारभावाप्रमाणे किंवा सण १९९३ च्या बाजारभावाने भरण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितले असून त्यांच्याकडून निर्देश प्राप्त होतास पुढील कार्यवाही केली जाईल असे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.
To Top