शिरोळ ! चंद्रकांत भाट ! आंदोलन अंकुशच्या शिष्टमंडळाने केली साखर आयुक्तांकडे मोठी मागणी : सहकारी व खाजगी कारखान्यांनी उपपदार्थांचा नफा...

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
शिरोळ : चंद्रकांत भाट
साखर व उप पदार्थांना गेली दोन वर्ष चांगला दर मिळाल्यामुळे साखर कारखाने मोठया फायद्यात आले आहेत त्या नफ्यातील वाटा दुसरा हप्ता म्हणून शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशी मागणी  आंदोलन अंकुशच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त डॉ चंद्रकांत पूलकुंडवार यांची भेट घेऊन केली.
 आयुक्ताना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की गेल्या वर्षी खोडवा उसाचे एकरी उत्पादन कमी झाले व मशागत खते औषध्ये मजुरीचे दर वाढल्यामुळे उसाचा उत्पादन खर्चही मोठया प्रमाणात वाढला आहे.ज्या प्रमाणात उसाचा उत्पादन खर्च वाढला त्याप्रमाणात उसाची एफ आर पी वाढलेली नसल्यामुळे ऊस शेती तोट्यात गेली असून शेतकऱ्यांना पीक कर्ज सुद्धा फेड करता आलेले नाही.
शासनाने इथेनॉलला चालना देण्याचे धोरण घेतल्यापासून सर्वच साखर कारखान्यांना मळी विक्रीतून व जे कारखाने इथेनॉल निर्माण करतात त्यांना अतिरिक्त फायदा होत आहे त्या फायद्यातील वाटा शेतकऱ्यांना मिळणे हा त्यांचा हक्क असून वाढलेल्या साखर दरातील जादा रक्कम शेतकऱ्यांना दुसरा हप्ता म्हणून मिळाली पाहिजे अशी मागणी आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली आहे 
यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आलेला आहे त्याला नव्याने लागण करण्यासाठी सध्या पैशाची गरज आहे.
राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्याकडे साखर  व उपपदार्थ विक्रीतून जादा पैसे आजरोजी उपलब्ध आहेत ते शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात देण्याचे साखर आयुक्तांनी आदेश द्यावेत अशीही विनंती यावेळी करण्यात आली.
साखर कारखान्यांनी तोडणी वाहतुकीच्या खर्चात नियमाच्या बाहेरचे खर्च टाकून तोडणी वाहतुकीचे खर्च वाढवले आहेत.
या खर्चाचे प्रामाणिकरण करताना विशेष लेखापारीक्षकांनी सुद्धा अशा खर्चाना डोळे झाकून मान्यता दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपये कारखान्यांनी लुबाडले आहेत.
राज्यातील सर्वच शासनाच्या लेखापारीक्षकांना तोडणी वाहतुकीच्या खर्चाचे शासनाच्या नियमाप्रमाणे पुन्हा प्रामाणिकरण करण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी साखर आयुक्ताना केल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.

कारखान्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य
शासनाने निर्धारित केलेली एफ आर पी देऊन त्यांच्याकडे पैसे असतील तर ते देण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे
त्यानुसारच पुणे जिल्ह्यातील काही कारखान्यांनी दिले आहेत असेही त्यांनी सांगितले. इतर मुद्यावर शेवटच्या आठवड्यात वेळ देतो त्यावेळी डिटेल प्रेझेंटेशन करा त्यात मला पटले तर आदेश देतो असे आश्वासन साखर आयुक्त  पुलकुंडवार यांनी दिले. सदर चर्चेवेळी संचालक अर्थ श्री गिरी हे उपस्थित होते. यावेळी दीपक पाटील दत्तात्रय जगदाळे धनाजी माने आप्पा कदम प्रमोद बाबर बाळासाहेब भोगावे सुनील बाबर मलगोंडा चौगुले आनंदा भातामारे महेश जाधव संभाजी निबाळकर पोपट संकपाळ महादेव काळे हे उपस्थित होते.
To Top