भोर ! अन्याय-अत्याचार करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर...मात्र सामाजिक एकोपा गरजेचा : पोलीस निरीक्षक शंकर पाटील

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
 भोर तालुक्यात अन्याय-अत्याचार करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून जनतेला न्याय देण्याचे काम प्राधान्याने करीत असताना समाज एकोपा राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भोर पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सोमवार दि.११ केले.
           पोलीस निरीक्षक पाटील पुढे म्हणाले भोर तालुका दुर्गम डोंगरी असून नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. तालुक्यात प्राधान्याने महिला तसेच विद्यार्थिनी यांची होणारी छेडछाड करणाऱ्यांना कायद्याचा कचाटा दाखवून कडक कारवाई केली जाईल.तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्याने पाऊल उचलले जाईल.जनतेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय- अत्याचार होऊ देणार नाही.विशेष म्हणजे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रांताधिकारी,नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच व्यापारी संघटना यांचे समवेत बैठक घेऊन लवकरच प्रश्न मार्गी लावणार आहे.तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ठेचून काढले जाईल. आठवडे बाजारादिवशी होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसेल असे नियोजन केले गेले आहे.यावेळी पत्रकार पुरुषोत्तम मुसळे, विजय जाधव, भुजंगराव दाभाडे,चंद्रकांत जाधव, सूर्यकांत किंद्रे ,कुंदन झांजले ,दीपक पारठे,अर्जुन खोपडे, रुपेश जाधव, विलास मादगुडे ,सारंग शेटे,संतोष म्हस्के,निलेश खरमरे,विनय जगताप, इमरान आतार, स्वप्निल पैलवान,संतोष ढवळे तसेच गोपनीय विभागाचे दत्तात्रय खेंगरे उपस्थित होते.

To Top