सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
गोजबावी (ता. बारामती) येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या अजित केसरी बैलगाडी शर्यतीत निंबुतच्या सृष्टी प्रिया गौतम काकडे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावत अजितदादा केसरी किताबासह प्रथम क्रमांकाचे दोन लाख बक्षीस पटकावले.
युवा नेते गौतम काकडे व युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहुल वाबळे यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून बैलगाडा शौकिनांनी मैदानात हजेरी लावली. तब्बल १ हजार ७३ बैलगाड्या या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या. राज्यात या बैलगाडा शर्यतीची रेकॉर्डब्रेक नोंद झाली. विजेत्यांना जवळपास १५ लाख रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्यांना मानाची ढाल व रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले. एक महिन्यापासून या मैदानाची चर्चा राज्यभरात होती.
शर्यतीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके व राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. सकाळी आठ पासून सुरू झालेल्या शर्यती रात्री आठ पर्यंत सुरु होत्या. शर्यतीत एकूण १०३ गट फेरे पार पडले. सेमी, कॉटर फायनल आणि सेमी फायनल मधून विजेते झालेल्या बैलगाडा मालकांना बक्षीस देण्यात आले. बैलगाडा शर्यतीत तुळजाभवानी प्रसन्न सृष्टी प्रिया गौतम काकडे निंबुत प्रथम, श्रीनाथ प्रसन्न बापूसाहेब आडके वाघोली द्वितीय क्रमांक, पिंटू शेठ मोडक वडकी रणवीर राहुल पाटील आडवली कल्याण तृतीय क्रमांक, निसर्ग गार्डन कात्रज पुणे चतुर्थ क्रमांक, सांजोबा प्रसन्न सचिन पिंपोडे पाचवा क्रमांक, निसर्ग गार्डन कात्रज पुणे (अ) सहावा क्रमांक, लक्ष्मी माता प्रसन्न जीवन ड्रायव्हर सातवा क्रमांक, सोमेश्वर प्रसन्न योगेश गायकवाड करंजेपूल आठवा क्रमांक, मनोज येळे पाडेगाव नववा क्रमांक, आई गावदेवी प्रसन्न सागाव डोंबिवली दहावा क्रमांक, सोमेश्वर प्रसन्न डायरेक्टर ऋषिकेश गायकवाड अकरावा क्रमांक पटकावत मानाची ढाल व बक्षीस मिळवले. सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, राहुल वाबळे, गौतम काकडे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.