बारामती-पुरंदर ! विजय लकडे ! ज्युबिलंट इन्ग्रेव्हीया कंपनीमधील स्फोटातील एका जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
नीरा ता. पुरंदर येथील ज्युबिलंट इन्ग्रेव्हीया कंपनीमध्ये इथल फाईव्ह कॉम्प्रेसर मध्ये स्फोट होऊन तीन ते कामगार जखमी झाले होते. त्यातील जखमी कामगार भरत सिंग रा. बिहार याचा मृत्यू झाला आहे. 
        याबाबत कंपनीने व्यवस्थापणाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार 2 सप्टेंबर रोजी जुबिलंट इन्ग्रेव्हीआ लिमिटेड नीरा येथील प्रकल्पात एक घटना घडली ज्याचा प्रभाव तीन व्यक्तींवर पडला. आमच्या ऑनसाईट इमर्जन्सी
टीमने तत्परता दर्शवत लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल केले.  त्यांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी याची कंपनी सत्यत्याने काळजी घेत होती  .
           त्यांतील एका व्यक्ती ला त्यांची स्थिती लक्षात घेता ,जलद  आणि चांगली वैद्यकीय सेवा मिळाली यासाठी पुण्यातील सुसज्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.हे कळविण्यास खेद होत आहे की सर्वोतपरी प्रयत्न करून सुद्धा ते या परिस्थितीतून बाहेर येऊ शकले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत व त्यांच्या कुटुंबियांना सर्व मदत देत आहोत. 
         मृत व्यक्ती हे कंत्राटी कामगार होते. एक जवाबदार कंपनी म्हणून सर्व कंत्राटी कामगारांची काळजी घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत .
जुबिलंट इन्ग्रेव्हीआ लिमिटेड आपल्या लोकांच्या आणि समुदायाच्या सुरक्षिततेसाठी वचंबद्ध आहेत आणि आम्ही सातत्याने त्यादिशेने प्रयत्नशील असतो.
--------------- .
To Top