सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथे गोपाळकाला या श्रावण महिन्यात साजऱ्या होणाऱ्या सणाचे अवचित्य साधून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला.
शाळेतील माध्यमिक विभागातील मुलांचे हाउसवाइज गोविंदाचे गट केले होते. प्रत्येक गटाला प्रथमत: हंडीला व उपस्थितांना सलामी देण्याची संधी देण्यात आली व नंतर लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक संघाला हंडी फोडण्याची संधी देण्यात आली. अतिशय चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीनंतर शाळेतील मार्स हाऊस ने हंडी फोडली. याप्रसंगी प्राथमिक व माध्यमिक विभागातील मुलींनी कृष्णजन्मावर व कृष्णलिलांवर आधारित सुंदर नृत्याविष्कार सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला पोमणे व सुनीता पवार यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक तसेच सर्व शिक्षक व शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.