सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
नीरा ( ता.पुुुरंदर) येथे पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या १४४५ व्या जयंतीनिमित्त स्टेशन मस्जिद, नीराच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
नीरा ( ता.पुरंदर) येथे पैगंबर जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे स्टेशन मस्जिद पासून लोणंदरोड , नगररोड ,बुवासाहेब चौक, अहिल्यादेवी चौक, शिवाजी चौक मार्गे पुन्हा लोणंदरोड व मस्जिद पर्यंत अशी हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या दर्गाहच्या ' गुंबद- ए- खिजरा'च्या प्रतिकृतीची मिरवणूूक काढण्यात आली होती.या मिरवणूकीमध्ये लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत नागरिक उपस्थित होते. नार- ऐ- तकबीर , अल्लाहू अकबर , नार - ऐ- रिसालत, या रसुलुल्लाह अशा प्रकारे विविध घोषणा देेेेऊन लहानमुले , तरूणांनी हजरत मोहंम्मद पैगंबर यांच्या विषयी आदर व्यक्त केला. स्टेशन मस्जिदमध्ये महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी पैगंबर जयंती निमित्त जेजुरीचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, सहा.पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसारे, पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर , नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, दत्ताजीराव चव्हाण, अनिल चव्हाण, अनंता शिंदे, सुनिल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ननवरे, विजय शिंदे, सुदाम बंडगर, हरीभाऊ जेधे ,राजेंद्र बरकडे, सुजित वाडेकर, अमोल साबळे, डॉ.विनय दगडे आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
मिरवणूकीतील बालचमूंना उपसरंपच राजेश काकडे यांच्यावतीने खाऊचे वाटप, फत्तेहमोहंम्मद युथ क्लबच्या वतीने सरबतचे वाटप तसेच मुस्लिम
समाजातील युवकांच्यावतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
नीरा येथील मुस्लिम समाजातील बहुसंख्य मुस्लिम तरूण कार्यकर्त्यां सह, स्टेशन मस्जिदच्या विश्वस्तांनी पैगंबर जयंतीच्या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. नीरा पोलिस दुरक्षेञाचे सहाय्यक फौजदार संदीप सोनवलकर, पोलिस कर्मचारी नीलेश करे, राजेंद्र भापकर, निलेश जाधव, संतोष मदने , पोलिस पाटील राजेंद्र भास्कर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
--------------------------------------------------------------
COMMENTS