सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
रक्तदान हेच श्रेष्ठ दान समजून भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे ता.भोर येथे नागेश्वर मित्र मंडळ शेडगे-भडाळे वार्ड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात पुण्यातील अक्षय ब्लड बँकेचे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन केले. यावेळी रक्तदान शिबिरात हिर्डोशी व वीसगाव खोऱ्यातील तरुणांचा मोठा सहभाग होता.आमदार संग्राम थोपटे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली.यावेळी युवा उद्योजक अनील सावले, जि. प सदस्य कुलदीप कोंडे,भाजपा तालुकाध्यक्ष जीवन कोंडे ,कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती आनंदा आंबवले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, सरपंच अमर भुद्गुडे, युवक काँग्रेस सरचिटणीस स्वप्निल भडाळे, सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर, शिवाजी साळेकर, विनोद घोलप, संतोष खोपडे,गिरीश धोंडे,अनिल जेधे,तुशार साळेकर,अर्जुन साळेकर,अजय साळेकर,सभाधान पारठे,सागर पारठे,वैभव घोलप,संजोग घोलप,दिपक घोलप,राहूल घोलप आदींसह रक्तदाते उपस्थित होते. रक्तदान शिबिर पार पडण्यासाठी मंडळाचे पदधिकारी संदिप शेडगे,सुमित शेडगे,संतोष शेडगे,भरत शेडगे,अजय शेडगे,संदिप भडाळे,अधिराज शेडगे यांचे सहकार्य लाभले.