खंडाळा ! तालुक्यातील इच्छुकांसाठी कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी मिळणार ५० टक्के अनुदान : 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : प्रतिनिधी
सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणे या योजनेच्या ५० टक्के अनुदान लाभासाठी खंडाळा तालुक्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी ३० सप्टेंबर पर्यंत पंचायत समिती, खंडाळा पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वि.तु. सावंत यांनी केले आहे.
         योजनेंतर्गत एकूण प्रकल्प किंमत १० लाख २७ हजार ५० असून सर्व प्रवर्गातील लाभार्थींना शासनाचे पन्नास टक्के अनुदान म्हणजे ५ लाख १३ हजार ७५० देय असून उर्वरित ५० टक्के रक्कम लाभार्थीने स्वत:चा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभारायाचा आहे. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी १८ ते ६० वर्ष वयोगटातील असावा, असेही  डॉ. सावंत यांनी कळविले आहे.
To Top