सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सातारा : प्रतिनिधी
बहूदा उच्च शिक्षीत कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी क्षेत्रातील उमेदवारांना नोकरीसाठी परदेशात जाताना पाहिले आहे. आता आयटीआय मधील प्रशिक्षणार्थी देखील आपल्या देशाची वेगळी ओळख निर्माण करुन देण्यात सज्ज झाले आहे.
उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा येथील प्लॅस्टीक प्रोसिंग ऑपरेटर या व्यवसायाचा प्रशिक्षणार्थी हर्ष बांबरस याची जपान येथील नोकरीसाठी निवड झाली आहे. हर्ष बांबरस यांचा निवडीबाबत प्रातिनिधक स्वरुपात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, संचालक दिगंबर दळवी आदी उपस्थित होते.
आयसीटीएसएम या व्यवसायाचा प्रशिक्षणार्थी अमिन अत्तार यांची जर्मनी येथे नोकरीकरीता निवड झाली आहे. तो सप्टेंबर 2024 मध्ये जर्मनी येथे जाणार आहे. प्लॅस्टिक प्रोसिंग ऑपरेटर व्यवसायाचे अजून तीन प्रशिक्षणार्थी देखील लवकरच जपान येथे नोकरीसासाठी जाणार आहेत.