खंडाळा ! शिरवळजवळ सोळा लाखांचा गुटखा जप्त : शिरवळ पोलिसांची कारवाई, एकाला अटक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खंडाळा ! मोहित देवधर
शिरवळ पोलिसांकडुन तोंडल गावच्या हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १६ लाखांचा गुटखा व वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली. 
        याबाबत शिरवळ पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण व नवनाथ मदने पोलीस निरीक्षक शिरवळ यांना शिरवळ परिसरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली, यावरून संबंधित वाहन पकडण्यासाठी लोणंद-शिरवळ मार्गावरील तोंडल गावच्या हद्दीत पो. उप. सतीश अंदेलवार व कर्मचाऱ्यांकडून नाकाबंदी करण्यात आली. यावेळी पकडलेल्या संशयित वाहनातून (क्र. एम.एच.१२ टी.व्ही. ९३८५) महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटख्याची (हिरा पान मसाला व सुगंधी तंबाखू) एकुण ९० पोती मिळून आली. या कारवाईमध्ये एकूण ८ लाख ९९ हजार ८५० रुपये किमतीचा गुटखा व ७ लाख रुपयांचे वाहन असा एकूण १५ लाख ९९ हजार ८५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच कपिल शिवानंद एकांडे (वय-२५ रा. इचलकरंजी, ता. हतकणंगले, जि. कोल्हापूर) यांस अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.उपनि. शंकर पांगारे अधिक तपास करत आहेत. 
सदर कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक, बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक, राहुल दस उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाण्याचे पो. नि. नवनाथ मदने, पो.उपनि. सतीश अंदेलवार, पो. उपनि. शंकर पांगारे, पो. अमंलदार  संजय थोरवे, सचिन भोसले, दत्तात्रय लवटे, भास्कर पिचड, अरविंद बाऱ्हाळे यांच्याद्वारे करण्यात आली.
To Top