सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : मोहित देवधर
पुणे-बंगळुरु महामार्गावर खंडाळानजीक झालेल्या मालवाहतुकीच्या वाहनांच्या अपघातात तिघे जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. खंडाळा येथील मोटेवस्ती येथे हा अपघात झाला. पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर हा अपघात झाला. याबाबत शिरवळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
पंक्चर झालेल्या ट्रकला मागून येऊन दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मालवाहतुकीचा ट्रक (क्रमांक- के.ए. ५३, सी. ८३४३) पंक्चर झाल्याने महामार्गावर उभा होता यावेळी पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोची (क्रमांक- के. ए. २२, ए. ए. १५५१) ट्रकला जोरदार धडक बसली या अपघातामध्ये आयशर टेम्पोच्या केबिनचा अक्षरशा चुराडा झाला तसेच ट्रकमालक मंजुनाथ यल्लाप्पा कावली (वय २८, रा. पामलदिनी, ता. गोकाक, जि. बेळगाव), आंनद गुरुसिद्ध गंगाई (वय ३०, रा. पामलदिनी, ता. गोकाक व नायकप्पा सत्यप्पा नायकर (वय ३४, रा. उज्जनकोप, ता. रामदुर्ग, जि. बेळगाव या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
COMMENTS