सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी ( पुणे ) येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या वजनी गटात अली सय्यद याने प्रथम क्रमांक पटकावला.
अली हा काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये शिकत असून खुल्या वजनी गटात त्याने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. यापूर्वी त्याने अनेक कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवत अनेक बक्षिसांची लय लूट केलेली आहे. निंबुत तेथील तरकारीचे व्यापारी रियाज सय्यद यांचा हा मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, सोमेश्वरचे संचालक अभिजीत काकडे, मु सा काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास वायदंडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
काका पवार तालीम पुणे चे वस्ताद पै शरद पवार, काकडे महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक दत्तात्रय जगताप, पै. सौरव जाधव यांचे याकामी त्याला मार्गदर्शन लाभले आहे त्याला मिळालेल्या या यशाबद्दल निरा व निंबूत परिसरातून कौतुक होत आहे.