सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
मॅरेथॉन सारखे उपक्रम राबविल्याने माणसाची मानसिक, शारिरीक क्षमता वाढण्यास मदत होते. स्पर्धेच्या युगात तरुणांना इतरांच्या बरोबर पळावे लागत असताना शारिरीक तंदुरुस्ती कडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबर शरीर तंदुरुस्त रहाणे आवश्यक असल्याचे मत नायब तहसिलदार सुनिल मुनाळे यांनी व्यक्त केले.
मेढा येथिल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे पी एम स्कील आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी बोलते होते. यावेळी जिल्हा पत्रकार संघटणेचे सचिव पत्रकार सोमनाथ साखरे, मोहन जगताप, बजरंग चौधरी, राजाराम ओंबळे, प्राचार्य शिंदे मॅडम, नितीन ढवळे सर आदी उपस्थित होते.
मेढा ते मामुर्डी असे ५ किलोमीटर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नायब तहसीलदार सुनिल मुनाळे यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. मॅरेथॉन स्पर्धेच्या मुलींच्या गटामध्ये अदिती शेलार हिने प्रथम क्रमांक, ऋतुजा सपकाळ हिने द्वितीय क्रमांक, ऋतुजा भिलारे हिने तृतीय क्रमांक पटकावला तसेच मुलाचे गटामध्ये शिभम मापले याने प्रथम क्रमांक, कुणाल धनावडे याने द्वितीय क्रमांक आणि रोहन तरडे याने तृतीय क्रमांक यांनी मिळविले.
मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन कूपर कॉर्पोरेशनचे देशपांडे, उद्योजक विजयजी सावले, श्री दत्त उपहार गृहचे प्रतिक पवार, कौस्तुभ पेट्रोलियमचे बापू वांगडे यांनी वस्तुरुपाने मदतीचा हात दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पवार तर उपस्थितांचे आभार नितीन ढवळे यांनी मानले.