सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील राजवाडा चौकातील जनता बँकेत सोमवार दिं.१८ शहरातील वृद्ध महिला पैसे खात्यावर भरण्यासाठी गेली असता अज्ञात चोरट्याने बँकेच्या चलनावर काहीतरी लिहायचे राहिले असे सांगून आजींची फसवणूक करून पैसे व चलन घेत २९ हजार रुपये लांबविल्याचा प्रकार घडला.
जनता बँकेत श्रीमती रत्नप्रभा रामचंद्र बांदल संजय नगर (भोर)या वृद्ध आजी ६६ हजार ८०० रुपये बँक खात्यात भरण्यासाठी गेल्या होत्या.गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने आज्जी तुमच्याकडून चलनावर अर्धवट माहिती भरली गेली आहे ती पूर्ण भरावी लागेल असे सांगून हातातील पैसे व चलन घेत फसवणूक करीत २९ हजार रुपये लांबविले. सीसीटीव्ही फुटेज मध्ये सर्व प्रकार कैद झाला असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.भोर पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू.