सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : विजय लकडे
ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी सरपंचपदी श्रुती महेश मदने यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षांत पाच सरपंच करायचे ठरले होते त्यानुसार अजित लकडे यांनी राजीनामा दिलेल्या रिक्त पदांवर श्रुती मदने यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद काकडे, वसंत मदने, सोमेश्वचे संचालक लक्ष्मण गोफणे, धनंजय गडदरे, उपसरपंच मगंल ठोंबरे, माजी सरपंच भाग्यश्री गडदरे, माजी सरपंच अजित लकडे, संतोष धायगुडे, वृषाली कटरे, मनिषा फंरादे, निवडणूक निर्णय अधिकारी शिवराम देष्टेवाड मंडल अधिकारी, दादासाहेब आगम तलाठी, सीमा गावडे ग्रामसेविका, राणी मदने पोलीस पाटील खंडोबाचीवाडी उपस्थित होते सरपंच निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांना तर्फे अभिनंदन करण्यात आले.