बारामती ! सचिन पवार ! तुमचा हेतु चांगला असेल तर....वाकड्यात शिरा : प्रदीप गारटकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : सचिन पवार
समाजात स्वार्थी वृत्ती वाढली आहे, मला तुमच्यापासुन काय फायदा आहे हे पाहुनच तुम्हाला मदत करु अशा विचारांचे लोक वाढत आहेत. अशा परिस्थीतीत सुपे येथील जयराम सुपेकर यानी धाडसाने गेली वीस वर्ष अनुदानाशिवाय  प्राजक्ता मतिमंद शाळा चालवली. हे सोप्पे नाही मदत सहज उपलब्ध होत नसते, मतिमंद मुलाना सांभाळ ळण्याचे मोठे आव्हान समाजसमोर आहे तुमचा हेतु प्रामाणिक असला तर प्रसंगी वाकड्यात शिरावे लागले तरी चालेल पण मतिमद मुकबधीरासाठी  मदत मिळाली पाहीजे  असे मत पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंगेस अध्यक्ष प्रदीप गारटकर यानी सुपे व्यक्त केले. 
           बारामतीच्या सिद्धिविनायक फौंडेशनद्वारे अध्यक्ष गणेश जोजारे यांचा वाढदिवस प्राजक्ता मतिमंद शाळेतील सर्व मुलाना कपडे व पादत्राणे तसेच खाऊ वाटुन साजरा केला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. सिद्धिविनायक फौंडेशन व सर्व धर्म समभाव संघटनेचे श्रीकांत झोरे ,संजय धुमाळ ,संतोष सातव ,दत्तात्रय धायगुडे ,परशुराम वाकळे ,जमीर ईनामदार ,प्रतिक जोजारे ,,ॲड गणेश आळंदीकर ,ॲड राम सुर्यवंशी ,सौरव आडाणे,शशी माळवे  यांच्यासह ३५ सदस्य यावेळी हजर  होते .
      गारटकर पुढे म्हणाले मी देखील १५० मतिमंद व मुकबधीर मुलांची शाळा चालवतो सुरुवातीच्या काळात अगदी शाळेच्या बांधकामापसुन मला अडचणी आल्या पण मी माझ्या स्टाईल ने वाळु सम्राट व ईतर जणाकडुन मदत मिळवली अनुदानाची  आशा सोडली व काम केले,स्वत: आयुक्तानी काम पाहीले व अनुदान दिले . बारामती राजकीय पंढरी तर आहेच पण संस्काराची शिदोरी येथे दिली जाते म्हणुनच  सुपेत मतिमंद शाळा व्हालवली जाते बारामती सिद्धिविनायक फौंडेशन लाखो रुपयांचे सामाजिक काम  करते ,गणेश जोजारे सारखे कार्यकर्ते तयार होतात .सुपे येथील शाळेच्या सर्व अडचणी आपण सर्व ताकद वापरुन निवारण करणार असे त्यानी आश्वासन यावेळी दिले .
       प्रस्ताविकात प्राजक्ता मतिमंद शाळेच्या कार्याचा आढावा अध्यक्ष जयराम सुपेकर यानी घेतला .गणेश जोजारे यानी शाळेला आणखी भरीव मदत करु असे सांगीतले. सुत्रसंचालन ॲड राम शिंदे यानी केले. बारामती तालुका ग्रा पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर तावरे ,जेष्ठ पत्रकार अशोक वेदपाठक ,सचीन पवार ,दुप्क कापरे ई मान्यवर यावेळी हजर होते .
To Top