बारामती ! सराफांनी चोख व पारदर्शक व्यवहार केल्यास कायदेशीर अडचण नाही : सुरेंद्र मेहता

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
सोने-चांदी व्यावसायिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपला व्यवसाय चोखपणे, पारदर्शकपणे करावा. तसे केल्यास कुणाचाही त्रास होणार नाही. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या अन्वये (पीएमएलए) महिन्यात एका ग्राहकांची 10 लाखांपेक्षा अधिक उलाढाल असेल तर सरकारला माहिती कळविणे बंधनकारक केले आहे. तसेच 500 कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या सराफ व्यावसायिकांनी नोडल ऑफिसर नेमावा. त्यापेक्षा छोटे व्यावसायिक आपल्या असोसिएशनला नोडल ऑफिसर म्हणून नेमू शकतात, असे प्रतिपादन इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (इब्जा) राष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र मेहता यांनी केले.
बारामती येथे बारामती सराफ असोसिएशनच्या वतीने विविध जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक, सुवर्णकार यांच्यासाठी 'आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा' (पीएमएलए) याविषयी प्रशिक्षण शिबिर तसेच मान्यवरांचा सन्मान सोहळा आदी कार्यक्रम आयोजित केले होते. याप्रसंगी मेहता बोलत होते. याप्रसंगी विजय लष्करे, संतोष बागडे, जयप्रकाश बेदरे, जे. बी. सराफ, किशोर शहा, श्यामसुंदर कुलथे, रुपाली शहाणे उपस्थित होते.
मेहता म्हणाले, समाजतील काहीं लोक काळा पैसा जमीन व सोने यात गुंतवतात. आपल्या सोने चांदी व्यावसायिकांचा यात वापर करतात. आपण याबाबत जागृत राहून संशयास्पद बाबी सरकारकडे कळविल्या पाहिजेत. तसेच व्यवसाय जितका ग्राहकाभिमुख होईल तितका करावा. 
इब्जाचे राज्य अध्यक्ष हरीश केवलरामाणी म्हणाले, सोन्यावर अथवा चांदीवर एचयुआयडी बंधनकारक केला तरी आपण त्या दृष्टीने अधिच मानसिक व आर्थिक तयारीत रहावे. नव्या बदलाना सामोरे जावे. तर इब्जाचे राष्ट्रीय संचालक विजय अग्रवाल म्हणाले, सोन्यावर एचयुआयडी आला आहे तसा चांदीवर भविष्यात येऊ शकतो. चांदी व्यवसायाला भविष्य मोठे आहे

बारामती असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल सावळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुधीर पोतदार यांनी आभार मानले.
--------------------
 आळंदीकर यांचा सन्मान
इब्जा या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण आळंदीकर यांचा बारामती सराफ असोसिएशनच्या वतीने चंदुकाका पेढीचे किशोरशेठ शहा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पोलिस विभाग सातत्याने सराफांच्या पाठीशी उभा असल्याने पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश कांबळे, पोलिस निरीक्षक किरण अवचर, दिनेश तायडे, प्रभाकर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांचा असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच असोसिएशनने यापुढे कमिटी निवडताना 50% महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला तसेच आताच्या कमिटीने 50 लाखांचे कार्यालय उभे केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. अमृतराज मालेगांवकर व पुनम मालेगांवकर यांनी असोसिएशनला सुवर्णकार व्यवसायाची प्रतिकात्मक गणपतीची दुर्मिळ मूर्ती भेट दिली.
To Top