पुरंदर ! नीरा येथील अहिल्यादेवी चौकात गतीरोधक बसवण्याची मागणी : जेष्ठ नागरिकांचे बांधकाम विभागाला पत्र

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : विजय लकडे
नीरा ता पुरंदर  येथील अहिल्यादेवी चौक येथे गतिरोधक बसावा अशी मागणी निरा येथील जेष्ठ नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा कार्यालय वडगाव निंबाळकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.  
           नीरा येथील लक्ष्मी रोड समजल्या जाणाऱ्या अहिल्यादेवी चौकात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते  महात्मा गांधी विद्यालय, लीलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षण घेणारे सुमारे साडेचार हजार विद्यार्थी याच चौकातून रस्त्याने ये जा करत असतात . नगरहून पुण्याकडे जाणारी अवजड वाहतूक याच रस्त्याने होत असते या चौकात शेती व शेती उपयोगाची औषधी दुकाने किराणामाल हॉस्पिटल. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे व शिव तक्रार गावामध्ये जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात यामुळे या चौकात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. अस्ताव्यस्त पार्किंग मुळे येथे अपघात होण्याची ही शक्यता आहे.
                ज्येष्ठ नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांना येथे जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागतो.  पावसाच्या पाण्याचा निचरा देखील येथील चौकात व्यवस्थित होत नाही. यामुळे नेहमी वर्दळीच्या असलेल्या चौकात गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी जेष्ठ नागरिकांनी शाखा अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव निंबाळकर यांच्याकडे केली आहे.
To Top