सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव - प्रतिनिधी
आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाचे शिक्षक बी सी बालगुडे यांना पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा टी. डी. एफ. व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दि.5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी जाहीर केले जातात. याही वर्षी जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींना 2 जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार व 61 जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहेत. आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात कार्यरत असणाऱ्या विज्ञान व क्रीडा शिक्षक म्हणून उल्लेखनीय काम केल्याबद्दल बी.सी. बालगुडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे पुरस्कार प्रदान कार्यक्रम रविवार दि. २४ रोजी समता पॅलेस फरांदेनगर पुणे येथे दुपारी बारा वाजता होणार आहे.
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, सचिव भारत खोमणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी होळकर यांनी बी.सी. बालगुडे यांचे अभिनंदन केले.