बारामती ! ईडा पीडा टळूदे....बळीचं राज्य येऊ दे...! देवा भरपूर पाऊस पडू दे..मोरगाव ग्रामस्थांचे गणपतीला साकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : मनोहर तावरे
राज्यात गेली चार महिने पाऊस  नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे या पावसाचे आगमन व्हावे म्हणून गावा-गावातून देवाला साकडं घालण्याची एक सामाजिक प्रथा आहे. अशीच ही एक खास बातमी आहे. अष्टविनायक स्थान असलेल्या मोरगावच्या मंदिरात ग्रामस्थांनी यासाठी प्रदक्षिणा सुरू केली आहे.

     दरवर्षी जून महिन्यात सुरू होणारा पाऊस मात्र यावर्षी पडलाच नाही. परिणामी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेलाय. शेतकरी व सर्वसामान्य जनता पाऊस नसल्याने चिंतेत आहे. मोरगाव येथे जय गणेश प्रतिष्ठान कार्यकर्ते यांनी  यासाठी पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांना एकत्र करून मयुरेश्वर मंदिराला अखंड प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प केला आहे.याबाबत स्थानिक पुजारी किशोर वाघ यांनी सविस्तर माहिती दिली.

        सर्वत्र मोठ्या प्रमाणात  पर्जन्यवृष्टीसाठी सामूहिक प्रार्थना सुरू आहे. गावातील समस्त ब्रह्मवृंद हे मंत्र उपचार पूजा विधि करीत आहेत. याबाबत जय गणेश प्रतिष्ठानच्या वतीने केदार वाघ व अभिषेक गोसावी यांनी आज सकाळी माध्यम प्रतिनिधींना ही माहिती पहाटेपासून मंदिरात सुरू असलेल्या प्रदक्षिणा घालण्यासाठी महिला पुरुष व तरुण मंडळींनी सहभाग घेतला. तसेच अनेक कुटुंबांनी सर्व सदस्यांसमवेत स्वयंपूर्ण सहभाग घेतला आहे.  
To Top