सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

खंडाळा ! शिरवळच्या एके गॅंगवर मोक्का : गंभीर गुन्हे दाखल असल्याने टोळीप्रमुखासह चौघांवर मोक्का

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरवळ : प्रतिनिधी
शिरवळ ता. खंडाळा येथील AK गॅन्ग मधील चौघांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. 
       सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगावर, टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणा-या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का) अन्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फिर्यादी हे त्यांच्या ओळखीच्या मित्राकडे उसने दिलेले पैसे परत घेण्याकरीता चालत जात असताना आरोपी आतिष ऊर्फ बाबु राजेंद्र कांबळे वय २२ वर्ष रा. बौध्दआळी शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा याने मोटारसायकलवरुन फिर्यादी यांना कट मारला म्हणुन फिर्यादीने त्याला विचारणा केली असता आतिष ऊर्फ बाबु राजेंद्र कांबळे याने शिवीगाळ केली व थांब तुला बघुन घेतो तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत तलवारीसारखे लोखंडी हत्याराने मारहाण करुन जखमी केले म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिष्टरी नोंद करण्यात आलेला. 
        सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये टोळी प्रमुख आतीष ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, वय २१ वर्ष रा. बौध्दवस्ती शिरवळ ता. खंडाळा, टोळी सदस्य विशाल शेखर वाडेकर वय २० वर्षे रा. कावळे आळी शिरवळ ता. खंडाळा, रामा दादा मंडलिक वय २१ वर्षे रा. सटवाई कॉलनी शिरवळ ता. खंडाळा , संजय विजय कोळी वय २० वर्षे रा. संभाजी चौक खंडाळा, ता. खंडाळा यांनी टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस निरीक्षक नवनाथ मदने शिरवळ पोलीस ठाणे यांनी नमुद टोळी विरुध्द दाखल असले गुन्ह्यांची माहिती संकलित केली असता त्यांचेवर जुलुम जबरदस्ती करुन हिंसाचाराची धमकी देऊन किंवा अन्य अवैद्य मार्गाने दहशत व बळाचा वापर करुन अपनयन करुन गंभीर दुखापत, गंभीर दुखापत करून जबरी चोरी, जबरी चोरी व जबरी चोरीचा प्रयत्न, खंडणी व जबरी चोरीसाठी गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न घरफोडी चोरी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपींचेविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई करीता पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
       विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परिक्षेत्र सुनिल फुलारी यांनी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यांचे कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी करुन सदर गुन्हयास मोक्का कायदयान्वयेची कलम वाढ करणेची परवानगी देवून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण राहुल धस यांच्याकडे देण्यात आला आहे.
       मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता  पोलीस अधीक्षक, सातारा समीर शेख, व  अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली  उपविभागीय पोलीस अधिकारी, राहुल धस,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने शिरवळ पोलीस ठाणे, सपोनि केंद्रे, पोउपनि सतिश अंदेलवार, शंकर पांगारे, तसेच पो.ना. अमित सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, पो.हवा जितु शिंदे, सचिन वीर, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर म- शिरवळ पोलीस ठाणे या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.
        नोव्हेंबर २०२२ पासुन ०८ मोक्का प्रस्तावामध्ये १०९ इसमांविरुद्ध मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे. तसेच २४ इसमांविरुध्द हद्दपारीसारखी व ०१ इसमास MPDA कायदयान्वये स्थानबध्द करणेत आले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द मोक्का, हद्दपारी, MPDA अशा प्रकारच्या कठोर कारवाया करणेत येणार आहेत.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : खंडाळा ! शिरवळच्या एके गॅंगवर मोक्का : गंभीर गुन्हे दाखल असल्याने टोळीप्रमुखासह चौघांवर मोक्का
खंडाळा ! शिरवळच्या एके गॅंगवर मोक्का : गंभीर गुन्हे दाखल असल्याने टोळीप्रमुखासह चौघांवर मोक्का
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgYD12ZqlwlfVbg8gBzgQzbe9IMqWE7K3olsYv6pYCsJBYFjL_gPfBJhNN7TToRiEDQ-JWGyfwYAqIgktQbLhwkw9fNy6-ZkOgrP2DNyoXy6b4sUxyl7JlbucXEFkTZJ7ZAi37NGfaU8fxAu-22YdRZwIO4D7f5wHfHRdGfSbpE2f52iWvpLfG784ceSTdl
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgYD12ZqlwlfVbg8gBzgQzbe9IMqWE7K3olsYv6pYCsJBYFjL_gPfBJhNN7TToRiEDQ-JWGyfwYAqIgktQbLhwkw9fNy6-ZkOgrP2DNyoXy6b4sUxyl7JlbucXEFkTZJ7ZAi37NGfaU8fxAu-22YdRZwIO4D7f5wHfHRdGfSbpE2f52iWvpLfG784ceSTdl=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/09/blog-post_19.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/09/blog-post_19.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy