खंडाळा ! शिरवळ येथील २१ लाखाच्या चोरीतील सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या : शिरवळ पोलीसांची कर्नाटकात धडक कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा फ्रिज व वॉशिंग मशीन असलेला लाखोंचा माल भिवंडीतील गोडाऊनला पोहचवण्यासाठी निघालेल्या कंटेनर गाडीतील माल कंटेनरसह लंपास केल्याची फिर्याद ड्रायव्हर अशोक वेणु चव्हाण वय ४१ वर्षे रा. बेगम तालाब तांडा, पोलीस थाना, जलनगर, ता. जि. विजापुर, राज्य कर्नाटक विरोधात शिरवळ पोलीसात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी शिरवळ पोलीसांनी वेषांतर करून परराज्यात कारवाई करत अशोक चव्हाण याला ताब्यात घेतले आहे.

या घटनेत पोलीस निरीक्षक मदने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सहा. पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला, पोलास अमलदार अजित बोराटे, पोलीस अंमलदार तुषार अभंग यांच्या पथकाने विजापुर कर्नाटक, पेठनाका कोल्हापुर, तासवडे टोल नाका, विजापुर परीसरातील लमान तांडे आदी परीसरात गोपनीय माहीती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन सदरचे फ्रिज व वॉशिंग मशीन हे विजापूर जिल्हयातील विजापुर तालुक्यातील लमान तांड्यामध्ये विविध ठिकाणी परीसरामध्ये विकल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार शिरवळ पोलीसांच्या पथकाने विजापुर येथुन गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या आरोपीस वेष बदलत मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवून सुमारे १४ लाख ४५ हजार किंमतीचा फ्रिज व वॉशिंग मशीनचा मुद्देमाल जप्त केला आहे 

सदरची कारवाई सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख,अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर, फलटण उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली शिरवळ पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलीस अंमलदार अजित बोराटे, पोलीस अंमलदार तुषार अभंग यांनी केली.
To Top