सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
समर्थ ज्ञानपीठ संचालित सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालय वाघळवाडी,सोमेश्वर नगर,ता.बारामती, जि.पुणे या संस्थेस सन 2023 -24 पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाची मान्यता मिळालेली आहे.
सदर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सदर अभ्यासक्रमास 60 प्रवेश देण्यात येणार आहेत. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून पदवीधर झालेले विद्यार्थी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
मर्यादित प्रवेश क्षमता असल्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत यांनी केले आहे.