बारामती ! भाजप प्रदेश शिक्षक आघाडीच्या संयोजकपदी प्रा. डॉ. नारायण राजूरवार यांची नियुक्ती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश शिक्षक आघाडी कार्यकारिणीची घोषणा केली आहे.
           यामध्ये पुण्यातील डॉ. प्रा. नारायण राजूरवार यांची पश्चिम महाराष्ट्र संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. प्रशम कोल्हे यांची प्रदेश संयोजक म्हणून नेमणूक करण्यात आली असून, कार्यकारिणीमध्ये एक सहसंयोजक, सात विभाग संयोजक आणि १३ कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. डॉ. राजूरवार गेल्या १६ वर्षांपासून प्राध्यापक कार्यरत आहेत; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राजशास्त्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
To Top