सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आयुष्यात सकारात्मक राहील्यास कोणतेच यश दुर नसते .त्यामुळे अभ्यासातील चिकाटी ने यशवंत व्हा तीच शिक्षकासाठी तुमची गुरुदक्षिणा असेल. असे मत जेष्ठ वकिल गणेश आळंदीकर यानी आज वाकी चोपडज च्या न्यु ईंग्लिश स्कुल पांढरवस्ती येथे व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते .
शाळेचे मुख्याध्यापक ईनामदार अध्यक्षस्थानी होते .प्रास्ताविक विनोद ननवरे यानी केले .यावेळी फरांदे, ,पुष्पलता जगताप ,भापकर ,सावळकर, आत्तार, तांबोळी, ,साळुंखे हजर होते .येथील शाळेत अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला येथील दहावीचे विद्यार्थी दोन दिवस विद्यार्थ्याना शिकवत होते व शिक्षक त्याना मार्गदर्शन करीत होते .आज या शिक्षक विद्यार्थ्यानी प्राचार्यापासुन सेवकापर्यंत सर्व जबाबदारी पार पाडुन दिवसभर शाळा पार पाडली त्यानंतर प्राचार्य ईनामदार यांनी सर्व शिक्षकांचा भेट वस्तु देवुन सन्मान करणेत आला तर विद्यार्थ्यानीही सर्व शिक्षकांचा सत्कार केला.
ॲड आळंदीकर पुढे म्हणाले सकारात्मक दृष्टीकोन असेल तर प्रतिकुल परिस्थीतीत देखील यशाचे शिखर दुर नसते.कारण ईंपॉसीबल शब्दात जसा आय एम पॉसीबल लपलेले असते तसेच नो मधे नेक्स्ट ॲपॉच्युनिटी असते .मुलानी एखादा विषय अवघड जातो म्हणुन न्युनगण्ड न बाळगता आवडत्या विषयावर जोर दिला तरी तुम्ही यशस्वी व्हाल.प्रतिकुल परिस्थीतीतुन यशस्वी झालेल्या परिसरातील गुणवंताची उदाहरणे देत मुलानी पेटुन अभ्यासात झोकुन दिले तर कोणतीच परिक्षा अवघड नाही असे ते म्हणाले .पांढरवस्ती च्या परिसराचा लोकसहभागातुन केलेल्या कायापालटाबद्दल त्यानी शिक्षकांचे कौतुक केले .
प्राचार्य ईनामदार सरानी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करीत प्रत्येक मुलात सुप्त गुण असतो फक्त तो जागृत करण्याचे काम शिक्षक करीत असतो अस्र सांगुन शाळेत क्रिडा सह विविध स्पर्धात यधवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले .