सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
माळेगाव ता. बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे हा राजीनामा दिल्याचे समजत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी तावरे यांनी राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हा राजीनामा संचालक मंडळाच्या सभेत मांडला जाणार असून त्यानंतर यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे संभाजी होळकर यांनी स्पष्ट केले आहे.