भोर ! निगुडघरला आरोग्य शिबीरात ३९० रुग्णांची तपासणी युवानेते पृथ्वीराज थोपटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे,महूडे खोऱ्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तर निगुडघरला आरोग्य शिबिरात ३९० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून २२ रुग्णांच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यात येणार आहे.
    सामाजिक बांधिलकी राखून हा उपक्रम युवानेते पृथ्वीराज संग्राम थोपटे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त रविवार दि .३ विसगाव खोरे, चाळीसगाव खोरे, हिरडोशी खोरे तसेच महूडे खोऱ्यात राबविण्यात आला असून उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. पुढील काळात तालुक्यात अनेक समाज हिताचे उपक्रम तसेच आरोग्य शिबीर राबवले जाईल असे थोपटे यांनी सांगितले.यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे,माजी जि. प.सदस्य विठ्ठल आवाळे,माजी सभापती बाळासाहेब थोपटे,राजगड संचालक उत्तम थोपटे,माजी सभापती लाहूनाना शेलार,माजी पं.स.सदस्य रोहन बाठे,बा.स.सभापती आनंदा आंबवले,ख.वी.संघ चेअरमन अतुल किंद्रे,जिल्हा युवकाध्यक्ष महेश टापरे,युवकाध्यक्ष नितीन दामगुडे,युवा उद्योजक अनिल सावले,राजेंद्र शेटे,अतुल शेडगे,संतोष केळकर,दीपक गायकवाड,प्रमोद थोपटे,संपत दरेकर,अनिता गावडे,अभिषेक येलगुडे,बापू शिरवले आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top