बारामती ! 'या' तारखेला होणार 'सोमेश्वर'ची वार्षिक सर्वसाधारण सभा : डिस्टलरी विस्तारवाढ तसेच ग्रामपंचायत वाघळवाडीला कारखाना मालकीची जागा देण्यासह हे असतील प्रमुख विषय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे या संस्थेची सन २०२२ - २०२३ या वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २९/०९/२०२३ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता कारखाना कार्यस्थळावरील “श्री छत्रपती शिवाजी महाराज" पुतळ्यामागील प्रांगणामध्ये आयोजित करणेत आलेली आहे. 
            हे असतील सभेपुढील प्रमुख विषय----------
१) मागील दि. २९/०९/२०२२ रोजी झालेल्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे.
२) संस्थेचे सन २०२२ - २०२३ या वर्षाचा मा. संचालक मंडळाकडून आलेला अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रके दाखल करुन घेणे व त्याचा स्विकार करणे.
३) सन २०२२ - २०२३ या आर्थिक वर्षामध्ये अंदाजपत्रकातील तरतुदीपेक्षा जादा झालेल्या खर्चास मा. संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार मंजूरी देणेबाबत विचार करणे.
४) सन २०२३ २०२४ या आर्थिक वर्षाकरीता मा. संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची व
त्यांनी सुचविलेल्या भांडवल उभारणीबाबतची नोंद घेणे.
५) वैधानिक लेखा परीक्षक यांनी कारखान्याच्या सन २०२२ २०२३ या वर्षाच्या दिलेल्या लेखा परिक्षण अहवालाची नोंद घेणे व मागील सन २०२१ २०२२ या वर्षाचा लेखा परिक्षण अहवालाचा मा. संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे.
६) सन २०२३ २०२४ वर्षाकरीता शासनमान्य लेखा परिक्षकांच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखा परिक्षकाची नेमणूक करणे व लेखापरिक्षण शुल्क ठरविणेबाबत. ७) कारखाना विस्तारवाढ प्रकल्पाचे भांडवली खर्चाची नोंद घेवून त्यास मंजूरी देणेबाबत.
८) डिस्टीलरी विस्तारवाढ करणेबाबत विचार करणे.
९) सन २०२२ - २०२३ या गाळप हंगामातील ऊस बिलातून भागविकास निधी योजनेअंतर्गत शिक्षण निधी कपात करणेबाबत विचार करणे.
१०) ग्रामपंचायत वाघळवाडी- सोमेश्वरनगर यांना कारखाना मालकीची जागा विनामोबदला बक्षिसपत्राने हस्तांतरीत करणेस मान्यता देणेबाबत.
११) मा. अध्यक्षसो यांचे पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे.
To Top