सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
ईश्वर माणसामध्ये असतो आणि आपण मात्र तो सर्वत्र शोधत असतो. वास्तविक मातेची माया लावून दुर्लक्षित मुलांचा सांभाळ करणं हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे मत बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.
कै. सरोज मोहन स्वामिनाथन मेमोरियल मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने कऱ्हा वागज (ता. बारामती) येथील यशोदीप निवासी मूकबधिर विद्यालयाने दिव्यांग व अनाथांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी संकुल बांधले आहे. या संकुलाचे उद्धाटन आणि 18 वर्षांवरील कर्णबधिर, मूकबधिर, अस्थिव्यंग व अनाथ मुलींसाठी मोफत ब्युटीपार्लर, शिवणकला व स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसचा शुभारंभ तहसीलदार गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव मालशे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी बारामती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष धनंजय जामदार, माळेगाव चे कार्यकारी संचालक अशोक पाटील, इब्जाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, उद्योजक अमित तावरे, एस. पी. सराफ, डॉ. अजय दरेकर, राजू बडदे, नितीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ज्याला ईश्वराने सगळे अवयव नीटनेटके दिले आहेत तो श्रीमंत. उरलेल्या गरीब समाजाकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे.
मुख्याध्यापिका रामेश्वरी जाधव यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष सचिन तावरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन पोतदार यांनी केले. संस्थेचे
खजिनदार प्रमोद जाधव यांनी आभार मानले.