सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
माळेगाव साखर कारखान्याला दहा गावे जोडण्याचा विषय सभेपुढे येताच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रचंड गोंधळ झालेला होता त्यावेळी विरोधक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी प्रतिसभा घेत ही १० गावे माळेगावला जोडण्यास प्रचंड विरोध केला होता त्यावेळी देखील ९०% सभासदांनी विरोधकांची भूमिका मान्य करत या प्रस्तावाला पाठिंबा दिलेला होता.
३०-९-२०२२ या दिवशी माळेगाव कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली होती त्यावेळी सोमेश्वर साखर कारखान्याच्या हद्दीतील दहा गावे माळेगाव कारखान्याला जोडण्यासाठी चा प्रस्ताव त्यावेळी चेअरमन बाळासाहेब तावरे यांनी सभासदांपुढे मांडलेला होता प्रचंड विरोध झाल्याने तत्कालीन संचालक मंडळास सभा अर्धवट सोडून सभागृहातून निघून जावे लागले होते सतत वर्षभर हा विषय वादळी ठरला होता,वार्षिक सर्वसाधारण सभेत शासनाचे प्रतिनिधी आलेले होते त्यांनीही दहा गावे माळेगावला जोडली जाऊ नये असा वस्तूनिष्ट प्रस्ताव शासनास व साखर आयुक्तांना लेखी स्वरूपात दिलेला होता.
परंतु सत्ताधारी संचालक मंडळाने हरतऱ्हेने आटापिटा केला पण ही १० गावे माळेगाव साखर कारखाना जोडलीच पाहिजेत यासाठी अनेक कल्पृत्या वापरल्या परंतु सभासदांचा विरोध कायम राहिला आणि अखेर नवनियुक्त अध्यक्ष केशवराव जगताप व उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांच्या संचालक मंडळाने अखेर नमते घेत ही १० गावे माळेगाव साखर कारखान्याला जोडली जाणार नाहीत अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
COMMENTS