सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : सुनील निंबाळकर
मुरूम गावामध्ये चार ठिकाणी मध्यरात्री घरपोडी झाली. या घरफोडी चारी ठिकाणी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले आहे. चारी ठिकाणी लॉक तोडून चोरी करण्यात आली आहे चारही ठिकाणी घरातील सर्व कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत.
याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील प्रमाणे अबुशा मुबारक इनामदार, शिवा गणपत भगत, बाबासाहेब आनंदराव ननवरे, राजेंद्र नंदकुमार दळवी यांच्या ठिकाणी घरफोडी झाली. घटनास्थळी करंजे पूल पोलीस स्टेशनचे देशमाने आणि वारुळे तसेच नुसरत इनामदार महिला दक्षता समिती सदस्य वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व जयेंद्र तात्याबा सोनवणे पोलीस पाटील यांनी भेट दिली पुढील तपास चालू आहे.