सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
राजगड सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून कारखान्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. कारखाना मागील हंगामात अचानक बंद ठेवल्यामुळे यंदाचा हंगाम सुरू होणार की नाही असा संभ्रम अनेकांच्या मनात असला तरी तो मोडीत काढून कामगार व शेतकरी यांच्या हितासाठी यंदा राजगडचा गळीत हंगाम लवकरच सुरू करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी कारखान्याच्या ३३ व्या वार्षिक सभेत केले.
अनंतनगर निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि.२६ कारखाना कार्यक्षेत्रात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी उपाध्यक्ष पोपट सुके, विकास कोंडे,के.डी.सोनवणे,शिवाजी कोंडे,शैलेश सोनवणे,शोभा जाधव,दिनकर धरपाळे,सुधीर खोपडे,सुभाष कोंढाळकर,प्रताप शिळीमकर,उत्तम थोपटे,बाळासाहेब थोपटे,आनंदा आंबवले,सतिष चव्हाण, खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, संचालक संपत दरेकर, राज तनपुरे,शेतकरी, सभासद उपस्थित होते.
आमदार थोपटे पुढे म्हणाले यंत्रणा चालवताना मोठी ओढाताण होत असते.आजपर्यंत आम्ही कोणाचाही एक रुपया बुडवलेला नाही आणि यापुढेही बुडवला जाणार नाही.वाहतूक ऊस तोडणी कामगार शेतकऱ्यांचे एफआरपी देणे तसेच कामगारांचे थकीत पगार आदी देणे आठवडाभरातच देणार आहोत.
COMMENTS